माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक

 

गाडीच्या चालकासह माजी आमदार जखमी

केज प्रतिनिधी 

केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीताताई ठोंबरे या केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दहिफळ वडमाऊली येथे गेल्या असता अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून सायंकाळी ६:०० वाजता त्या ऋषी गदळे यांच्या घरी चहापाण्यासाठी जात असताना विजय उत्तमराव गदळे यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात गाडीच्या ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला. 

त्या नंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांना लागून त्याही जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.