सौताडा धबधब्यात पडून शिक्षकांचा मृत्यु

Beed

अंंमळनेर दि.२३/ प्रतिनिधी 
पाटोदा येथील गटशिक्षण कार्यालयात कार्यरत अतिरिक्त शिक्षक असणारे गजेंद्र लक्ष्मणराव गुंडाले दिनांक २१रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास  सौताडा रामेश्वर येथे फिरण्यासाठी गेलेले होते त्यानंतर परत आले नसल्यामुळे  दुसर्‍या दिवशी दिनांक २२  रोजी सकाळी सौताडा येथे त्यांची गाडी मिळून आल्याने सदर परिसरात त्यांचा शोध घेतला परंतु ते कोणाला दिसले नाहीत त्यानंतर आज दिनांक २३ रोजी सौताडा येथील रामेश्वर मंदिरा जवळील नदीपात्रात एक मृतदेह मिळून आला त्यानंतर परिसरातील अनेक युवक व पाटोद्यातील युवक गेले असता तेथे जाऊन पाहिले असता ते गजेंद्र लक्ष्मणराव गुंडाले वय ३६ वर्ष राहणार आंबेजोगाई तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड हल्ली मुक्काम पोस्ट शिक्षक कॉलनी पाटोदा जि बीड हेच असल्याबाबत त्यांचे नातेवाईक व मित्रपरिवाराने ओळखले आहे त्यानंतर त्यांचा मृतदेह पी एम करण्यासाठी सरकारी दवाखाना पाटोदा येथे आणण्यात आला आहे पी एम करून पुढील अंत्यविधीसाठी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.