बीड बायपासला मोठा आपघात

बीड- शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात अज्ञात वाहनाने दुचाकीस्वराला उडविले. यामध्ये दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे.
अधिक माहिती अशी की, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तसेच शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात शनिवारी (दि.३) रोजी सायंकाळी ६:३० च्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने दुचाकी स्वराला उडविले. दुचाकीला उडविणारे अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाले होते. या अपघातात दुचाकी स्वार बांगर सुधीर विष्णू (वय-३६) रा.भोगलगाव यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

