पिंपळनेर परिसरात मुसळधार पाऊस

Beed

पुलावरून पाणी गेल्याने अनेक गावांचा  संपर्क तुटला
बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात बर्‍याच दिवसाच्या विश्रांतीनंतर दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले. गेल्या महिन्यात देखील असाच अचानक मुसळधार पाऊस पडल्याने गावांचा संपर्क तुटला होता,आज देखील जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत होते.यामुळे शेतकरी राजा खुष झाला असून,पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. गावामध्ये जाणार्‍या रस्त्यामध्ये असणारी नदी ओसंडून वाहिल्याने,पुलावरून पाणी जात असल्याने गावचा संपर्क तुटला आहे.