.संतोष साबळेंची बदली,आता एलसीबीचा तात्पुरता कारभार गणेश मुंडेंकडे

Beed

बीड दि.22 (प्रतिनिधी) बीड जिल्हा पोलीस दलातील एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागेचा पदभार सपोनि गणेश मुंडे यांच्यावर सोपविण्यात आला आहे. पोलीस दलात एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखा ही महत्वाची मानली जाते.बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे या पदावर  कार्यरत होते.
 बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार, त्यातील आरोपींना अटक करण्यात कमी पडलेली एलसीबी असेल किंवा जिल्ह्यातील चोर्‍या, घरफोड्यांवर नियंत्रण मिळविण्यात एलसीबीला आलेले अपयश, मागच्या काही वर्षात प्रथमच एसीबीच्या रडारवर एलसीबी येण्याची घटना असेल,यामुळे संतोष साबळे यांच्या कारकिर्दीबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. बुधवारी अखेर बीडच्या पोलीस अधीक्षकांनी एलसीबीमध्ये फेरबदल केले असून संतोष साबळे यांची एलसीबीमधून बदली  करण्यात आली आहे. आता एलसीबीची धुरा तात्पुरती गणेश मुंडे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.