स्वर्गीय उमेश जाधव (दंडम आण्णा) यांच्या जयंतीनिमित्त साहित्य वाटप

बीड दि.१० (प्रतिनिधी)- स्वर्गीय उमेश जाधव उर्फ दंडम आण्णा यांच्या जयंतीनिमित्त दंडम आण्णा मित्र मंडळाच्या वतीने पसायदान प्रकल्प येथे साहित्याचे वाटप करण्यात आले.
उमेश जाधव यांचा महाराष्ट्रात दांडगा जनसंपर्क होता. तरुणांमध्ये त्यांची चांगलीच क्रेज होती. मात्र नियतीला ते मान्य नसावे. २९ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. अण्णांच्या जाण्याने तरुणांमध्ये खूप निराशा होती. मात्र त्यांनी घेतलेल्या समाजसेवेचा वसा आणि अडचणीत सापडणाऱ्याला आधार देण्याचं काम आज त्यांचा मुलगा रितेश जाधव पार पाडताना दिसत आहे. दरवर्षी 10 जून रोजी अण्णांचा वाढदिवस मित्र परिवार मोठ्या उत्साहाने करायचे. मात्र आज आण्णा हयात नसल्यामुळे दंडम आण्णा अडचणीत आणि गरिबांना मदत करायचे या दृष्टिकोनातून ढेकनमोह येथील पसायदान प्रकल्प येथे शैक्षणिक साहित्य, दैनंदिन जीवनात लागणारे साहित्य आणि फळ वाटप करण्यात आले. यावेळी रितेश जाधवसह दंडम आण्णा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
धारूर येथील सरकारी रुग्णालयात फळ वाटप
धारूर येथील दंडम आण्णा मित्र परिवारातील सदस्य अभिजीत शेळके, दादा शेरकर, सोपनील लांडगे, शंतनु माने, अक्षय निरडे, कृष्णा ढेरे, अक्षय अंधारे यांनी स्वर्गीय अण्णांच्या जयंतीनिमित्त सरकारी दवाखान्यातील रुग्णांना फळ वाटप केले.

