नरेंद्र मोदींची हॅट्रिक!

दिल्ली- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने 294 जागा जिंकत काठावरचे बहुमत मिळवले. त्यामुळे आज नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी भाजपसह एनडीएच्या सुमारे 80 खासदारांनी मंत्रपदाची शपथ घेतली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या या शपथविधी सोहळ्यासाठी भारताच्या शेजारच्या अनेक देशांचे प्रमुख उपस्थित होते. याचबरोबर देशभरातील कला, क्रीडा, उद्योग आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थीती होती.
पंतप्रधान मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. त्यांच्यानंतर अमित शहा, नितीन गडकरी आणि जेपी नड्डा यांना राष्ट्रपतींनी शपथ दिली.
यावेळी नरेंद्र मोदी यांना कडेकोट बंदोबस्तात पंतप्रधानांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. राष्ट्रपती भवन संकुलात आयोजित या सोहळ्यासाठी सुमारे आठ हजार विशेष पाहुणे उपस्थित होते.
भारतासोबतचे संबंध ताणले गेल्याने चर्चेत असलेले मालदीवचे राष्ट्रपती आज भारताचे राज्य पाहुणे आहेत. राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे देखील शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात उपस्थीत होते.

