ताईसाहेबांचा मी पराभव सहन करू शकत नाही...

Ambajogai
अंबाजोगाई- पंकजा मुंडे यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे एका तरुणाने आज (दि.९) रोजी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
अधिक माहिती अशी कि, अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ अंबा येथील पांडुरंग रामभाऊ सोनवणे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ताईसाहेबांचा पराभव मी सहन करू शकत नाही म्हणून आत्महत्या करत असल्याची चिट्ठी त्याच्याजवळ सापडली आहे. मयत पांडुरंग सोनवणे याच्या पश्चात पत्नी चार वर्षाचा मुलगा आणि नऊ वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
By Name:

