सेवानिवृत्त सैनिक बारीकराव घुगे यांचे बोरफडीत जंगी स्वागत

Beed

बीड - सलग 23 वर्ष देशाची सेवा करून सेवानिवृत्त झालेले सैनिक बारीकराव घुगे यांचा गुणगौरव करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस बीड जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बारीकराव घुगे यांचे बोरफडीत जंगी स्वागत करण्यात आले. 

 

 

पुढे बाप्पासाहेब घुगे म्हणाले कि, अतिशय दुर्गम भागात वसलेले बोरफडी हे गाव आहे. या गावात जन्मलेले बारीकराव घुगे यांनी मेहनतीने सैन्यामध्ये भरती झाले व देशसेवा केली. त्यांचा आदर्श घेऊन गावातील विद्यार्थी व तरूणांनी जिद्दीने अभ्यास करून देशसेवा करावी व वेगवेगळ्या क्षेत्रात आपले करिअर घडवावे व आपले जिवणमान उंचवावे हा मोलाचा संदेश तरूणांना दिला. याप्रसंगी लालासाहेब घुगे (माजी उपसभापती पंचायत समिती बीड) सुमंत कुटे (तंटामुक्ती अध्यक्ष बोरफडी), ज्योतीराम घुगे (माजी सरपंच), बाळू घुगे, सुरेश (दादा) घुगे ( महाराष्ट्र उपकेसरी ), नवनाथ कुटे( मुकादम),सुरेश कदम,अशोक घुगे, रामदास कसबे, नवनाथ घुगे, संजय घुगे, अजय घुगे, भाऊसाहेब घुगे, भैय्यासाहेब वाघमारे, सोमीनाथ वाघमारे , सुरेश घुगे सर, नामदेव कुटे, लहू घुगे व समस्त गावकरी यावेळी उपस्थित होते .