अकोल्यासह महाराष्ट्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचा ऍड प्रकाश आंबेडकर यांना जाहीर पाठीबां - डॉ. जितेंद्र ओव्हाळ

महायुती महाविकास आघाडी दोनीही संविधान विरोधी
बीड-- महायुती सह महाविकास आघाडी एकाच नाण्याच्या दोन बाजू असून संविधान विरोधी असल्याचा आरोप डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी शुक्रवारी बीड येथे केला
डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अकोला जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे महाराष्ट्र प्रवक्ते मनिष जाधव सचिव दिलिप जेटे यांनी अकोल्यात ऍड प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचा पाठीबां दिला या वेळी पाठीब्याचे पत्र दिले या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी महाराष्ट्रात सर्वत्र ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला पाठीबां घोषित करत वंचितला मतदान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजन करण्याचे बीड येथून आव्हान केले या वेळी महायुती महाविकास आघाडी चे उमेदवार संविधान वाचवण्याच्या फुसक्या घोषणा करून संविधान प्रेमी मतदार यांची दिशाभूल करत आहेत संविधान वाचवणे सोडा या आधी संविधाणाची अंमलबजावणी करण्यासाठी काय केले असा सवाल करून गरीब मराठा ओबीसी मुस्लिम दलित समाजातील जनतेने कोणत्याही अमिषाला बळी न पडता ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी रहा राज्यात वंचित च्या उमेदवार यांना मतदान करा येत्या दोन दिवसात बीड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच कार्यकर्त्याचा मेळावा घेणार असल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी शुक्रवारी दिली

