तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनची फ्रेशर्स डे पार्टी उत्साहात साजरी

.मेहनतीच्या जोरावर मोठे व्हा - उपजिल्हाधिकारी डॉ.प्रियंका पाटील
बीड(प्रतिनिधी):- मेहनतीच्या जोरावर मोठे व्हा असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी डॉ.प्रियंका पाटील यांनी केले.
तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड येथील सन 2023 - 24 या वर्षात प्रथम वर्गात शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींसाठी फ्रेशर्स डे पार्टीचे आयोजन दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल नीलकमल येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून उपजिल्हाधिकारी डॉ.प्रियंका पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुरु आनंद फाउंडेशनच्या श्रीमती सीमा ओस्तवाल, इंजी. दिपंकर रोडे, प्रशासकीय अधिकारी सुदर्शन भालेराव तसेच तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या प्राचार्य अश्विनी बेद्रे,सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा.विद्या अवघडे, यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ.प्रियंका पाटील म्हणाल्या की, कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करण्याचे असेल तर त्याला मेहनतीची जोड लागते. फॅशन डिझाईनचे जग खूप मोठे असून सध्या नॅचरल डाईंगला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. केमिकल डाईंग निसर्गाला हानिकारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.प्राचार्य अश्विनी बेंद्रे यांनी पीपीटी द्वारे तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनने घेतलेल्या विविध उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा.विद्या अवघडे यांनी ड्रेस डिझाईन कोर्सचे महत्त्व पटवून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियंका बचुटे तसेच प्रा.सुप्रिया ससाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रंजना जोगदंड यांनी मानले. फ्रेशर्स पार्टी साठी गारमेंट डिझाईनिंग साठी विद्यार्थिनींना डिझायनर सिद्धार्थ एन्नेवार आणी आऐशा पठान यांचे मार्गदर्शन लाभले. मीस फ्रेशर्स प्रथम क्रमांक प्राजक्ता गायकवाड, द्वितिय क्रमांक ऋषाली लोखंडे, तृतीय क्रमांक अश्विनी उनवणे हिने पटकाविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथील सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

