शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्‍वर खांडें हल्ला प्रकरण

Beed

बीड : शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्‍वर खांडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॅनल टाकलेला होता. सदर पॅनल हा 2022-2023 चे ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये टाकलेला होता. त्यामध्ये गावतीलच कुंडलीक हरिभाऊ खांडे यांनी सुध्दा पँनल टाकला होता त्यावेळी पॅनल टाकु नकोस म्हणुन कुंडलीक हरीभाऊ खाडे, गणेश हरीभाऊ खांडे व बाळु हरीभाऊ खांडे यांचे कडुन मला सतत दबाव टाकण्यात येत होता. त्यानंतर ते मला सतत म्हणत होते की, तुझे हस्ते परहस्ते हातपाय तोडुन नाही टाकले तर बग असे म्हणत होते सदर बाबत माहिती बीड पोलीस अधिक्षक साहेबांना भेटुन सांगीतली होती. त्यावेळी अर्ज पण दिला होता. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलचे दोन सदस्य 1) आविनाश पाटोळे 2) अजय राऊत हे निवडुन आले आहेत. आमच्या पॅनलच्या निवडुन आलेल्या सदस्यांनी ग्रामपंचायत मध्ये आलेल्या कामाचे अनुशंगाने माहिती आधिकाराचा अर्ज दिला होता. त्यामध्ये कुंडलिक खांडे यास ते अर्ज मीच दायाला लावले असल्याचा राग मनात होता. त्या माहिती अधिकाराची माहिती मिळण्याची वेळ जवळ आली होती. तसेच मला शिवसेना शिंदे गट माजलगाव, वडवणी कार्यक्षेत्रात उपजिल्हा प्रमुख हे पद मिळाले होते. त्यावेळी मी गावा मध्ये बॅनर लावले होते. त्या मिळालेल्या पदामुळे मी बॅनर लावले होते. त्यामध्ये सुध्दा कुंडलिक खांडे यांचा फोटो नसल्यामुळे त्यांना राग होता. त्यानंतर मला दिनांक 02/04/2024 रोजी कुंडलिक हरिभाऊ खांडे यांचा सख्या मामाचा मुलगा गोरख उर्फ पप्पु शिंदे याचा फोन आला व मला म्हणाला की, तु खुप मोठा झालास तुझे पद मोठे आहे. असे म्हणुन धमक्या दिल्या आहेत. या बाबत पिंपळनेर पोस्टेला कल्पना दिली होती. व त्यांनी कारवाई करतो. असे सांगीतले होते. दि. 03/04/2024 रोजी मी माझे बीड मध्ये काम आवरुन गावाकडे माझे मित्र आविनाश प्रल्हाद खांडे आणि शंकर आश्रुबा राऊत असे माझे मित्राची स्वीप्ट डिझायर गाडी पाढ-या रंगाची एमएच 12 2234 यामध्ये बसुन जात असतानां अदांजे 05.30 वाजण्याचे सुमारास आम्ही शासकिय पॉलटेक्नीक कॉलेजच्या पुढे पुलाच्या पुढे थोड्या अंतरावर एक पाढ-या रंगाची टाटा व्हीस्टा गाडी डाबरी रस्त्याचे मधोमध उभी असल्याने आमचा गाडीचा चालक शंकर राऊत याने गाडी हळुवार घेत असतानां व्हीस्टा गाडीचे चालकाने आमच्या गाडीस त्याची गाडी आडवी लावुन त्यामधील आमच्या गावातील ओळखीचे सुनील पाटोळे, बाबा रतन पाटोळे, कृष्णा पाटोळे व बीड येथील लाला दुनघव हे आमच्याकडे आले व त्यामधील बाबा पाटोळे याने आमच्या गाडीचर्ची चावी काडुन घेतली व आम्हाला शिवीगाळ करत असतानांच तेथे दोन मोटारसायकलवर चारजण आले त्याच्याजवळ लाकडी दांडे होते. त्यावेळी पिस्टा गाडीतुन आलेल्या आमच्या गावातील लोकांनी पिस्टा गाडीतुन लोंखडी राँड लकडी दांडे काडुन मी गाडीतच असतानां सुनिल पाटोळे यांच्या हातात लोखंडी रॉड बाबा पाटोळे याचे हातात लोखंडी शाँकअप आणि कृष्णा पाटोळे याचे हातात लोखंडी पाईप व लाला दुनघव याचे हातात लाकडी दांडा असे होतो. त्यांनी मला गाडीतच मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी मला गाडीचे बाहेर ओडुन काडले त्यावेळी दोन मोटारसायकलवर आलेल्या अनोळखी चार लोकांचे चेहरे हे रुमालाने बांधलेले होते. त्यांचे हातात लाकडी दांडे होते. त्यांनी तु गावामध्ये खूप मोठा झाला व उपजिल्हाप्रमुख पद आमचे उरावर बसुन घेतले आहे असे म्हणुन त्या सर्वांनीच त्यांचे हातातील लोखंडी रॉड लाकडी दांडे यांनी जिवे मारण्याच्या उदेशाने बाबा पाटोळे याने माझ्या डोक्यात लोखंडी शाँकअपने मारहाण करीत असतानां मी माझा डाव्या हाताने डोक्यातील वार आडवला आसता डाव्या हाताला जखम झाली व इतर लोकांनी त्यांचे हातातील लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी माझे मित्र आविनाश खांडे व शंकर राऊत हे सोडण्यासाठी आले असता त्यांना सुध्दा त्यांनी मारहाण केली ते आम्हाला मारत असतांना ते म्हणत होते की. आमचे ठरल्या प्रमाणे कुंडलिक बापु खांडे हे दवाखण्या मध्ये आडमीट असुन त्यांचे दोन्ही भाऊ गणेश आणि नामदेव हे बीडच्या बौडच्या बाहेर आहेत. त्यामुळे तु त्यांचे नाव घेवु शकत नाहीस. आपण कुंडलीक बापुला सांगु ठरल्याप्रमाणे काम केले आहे. असे म्हणुन ते त्याच्या गाड्या घेवुन निघुन गेले. त्यावेळी तेथे काही वेळातच आमच्या गावातील अजय राऊत, आविनाश पाटोळे, हांनुमान खांडे व हारिदास खांडे हे आले व त्यांनी मला हारिदास खांडे यांचे चार चाकी वाहनातुन स.द बीड येथे. आनले स. द बीड येथे. आनल्यानंतर डॉक्टरांनी चेक करुन मला गंभीर दुखापत असल्यामुळे रेफर केल्याने माझ्या नातेवाईकांनी मला संचेती हॉस्पीटल पुणे येथे अँडमिट केले आहे. मला दोन्ही हाताला व दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तरी कुंडलिक हरिभाऊ खांडे, गणेश हरिभाऊ खांडे नामदेव हरिभाऊ खांडे व गोरख उर्फ पप्पु शिंदे यांनी मला जिवे मारण्याचा कट रचुन गावातील बाबा पाटोळे, सुनिल पाटोळे, कृष्णा पाटोळे, लाला दुनघव व इतर अनोळखी चार लोकांनी मला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या म्हणुन तक्रार दिली असून या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 307,326,324,341,120-ब,143,147,148,149,504,506 प्रमाणे ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.