शितलकुमार बल्लाळ साहेब भाजी विक्रेत्यांच्या पाठीवर मारा पोटावर का?

Beed

नुकसानीची भरपाई कोण देणार व्यपार्‍यांकडून सवाल?
बीड /बीडसत्ता प्रतिनिधी
शहरातील भाजीमंडई परिसरात आतिक्रमनच्या जागी काही व्यापार्‍यांनी फळाची तसेच भाजी विक्रेत्यांचे गाडे लावलेली होती. शितलकुमार बल्लाळ यांनी आज अखेरीस व्यापार्‍यांना सूचना  दिल्याच होत्या पण भाजीमंडईची जागा अपुरी असल्यामुळे सांगून सुद्धा व्यापर्‍यांना रोडवर बसावे लागते.शितलकुमार बल्लाळ यांनी भाजी विक्रेत्यांचे गाडे चक्क उलटून दिले.भाजी विक्रेत्यांना याची भरपाई कोण देणार? किंवा या ठिकाणच्या कमी अधिक प्रमाणत व्यपारीची हातावरील पोट आहेत मग या नुकसानाची भरपाई यांना कोण करून देणार? असा सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे .मात्र याउलट त्याठिकाणच्या भाजी विक्रेत्यांना  या आगोदर देखील शहरठाणे प्रमुख शितलकुमार बल्लाळ यांनी नोटीसा बजावल्यादेखील होत्याच मात्र भाजी मंडईला जागा अपूरी असल्यामुळे व्यापार्‍यांना अतिक्रमनाच्या जागी फळाची किंवा भाजीपाल्याची गाडे लावावी लागत आहेत. मात्र आज शीतलकुमार बल्लाळ यांनी गाडे न उलटून  देता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक होते. परंतु ते न करता त्यांनी भाजी विक्रत्यांचे गाडे पलटून दिले.तर साहेब त्यांच्या पोटावर न मारता पाटीवर मरावे अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा होती.