बीडमध्ये आढळले नवजात अर्भक

Beed

बीड दि.२ (प्रतिनिधी)- शहरातील एमआयडीसी परिसरात मंगळवारी (दि.२) नवजात अर्भक आढळले असून पोलिस प्रशासनाकडून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी कि, बीड शहरातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या एमआयडीसी परिसरात मंगळवारी (दि.२) नवजात अर्भक आढळले असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी हे अर्भक पाहिल्यानंतर तात्काळ पोलिस प्रशासनाला दुरध्वनीवरुन संपर्क साधला. यानंतर घटनास्थळी पोलिस प्रशासनाने धाव घेत अर्भक ताब्यात घेतले आहे. हे अर्भक कधीपासून याठिकाणी होते तसेच हे अर्भक कोणाचे आहे याचा अद्याप तपास लागलेला नाही. पोलिस प्रशासनाकडून पुढील तपास सुरु आहे.