तरुणींसाठी मित्राचा कोयत्याने खून

Maharashtra

बीडसत्ता / प्रतिनिधी

तुझ्यामुळे ती माझ्याशी बोलत नाही' राग अनावर; शाळकरी विद्यार्थ्याकडून मित्राचा कोयत्याने खून
गैरसमज आणि संताप यातून व्यक्ती कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. शालेय विद्यार्थ्यांमध्येही द्वेश, मत्सर वाढीला लागला आहे. यातून एखाद्याचे जीवन संपवण्यापर्यंत निर्णय घेतला जातो. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आलाय. मैत्रीच्या वादातून 15 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा कोयत्याने खून करण्यात आलाय. 

झोपेत असताना तरुणावर कोयत्याने आणि धारधार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रीत झालेल्या गैरसमजातून काही मिनिटांत मित्राचे आयुष्य संपवले गेलं. पुण्यातील पानशेत रस्त्यावरील मणेरवाडी येथील आनंदवन सोसायटीत थरारक घटना घडली. प्रकाश हरिसिंग रजपूत असे 15 वर्षीय मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. हत्येमागे शाळेच्या मैत्रीचे कारण सांगितले जात आहे. हल्लेखोर विद्यार्थी आणि मृत विद्यार्थी यांची एक कॉमन मैत्रिण होती. मैत्रिण प्रकाशसोबत बोलते मग माझ्यासोबत का नाही? नक्कीच प्रकाशने काहीतरी सांगितलं असणार, असा हल्लेखोराला समज झाला होता.