सोमेश्वर मंदीरासमोर एकाची आत्महत्या

बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
बीड शहरातील भगवान बाबा स्मशानभूमी रस्त्यालगत असलेल्या वळणाच्या बाजूला ज्या ठिकाणी बॅनर लावण्यासाठी बसवलेल्या अँगल फ्रेमला एक आज्ञात तरुणाने गळफान लावून आत्महत्या केली आहे .
बीड शहरातील बार्शी नाका पुलाच्या उत्तरेला भगवान बाबा स्मशानभूमीकडे जाण्याच्या वळणाला जाहिरातीचे बॅनर लावण्यासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी बॅनर फ्रेमला तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . या तरुणाचे वय अंदाजे 25 वर्ष आहे . तरुणाने गळफास का लावून घेतला याचे कायम अध्याप अस्पष्ट आहे. शहर पोलिस ठाण्याने यांनी सदरील तरूणांची काही ओळख आढळून आल्यास शहर ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

