सहाय्यक पोलीस निरीक्षकाची सुसाइड नोट आली समोर

सुभाष दुधाळ यांनी का केली आत्महत्या?
पुणे/प्रतिनिधी
सुभाष दुधाळ असं आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकार्याचे नाव आहे. सकाळी रेल्वे स्थानकातील रुळावर मयताच्या शरीराचे दोन तुकडे आढळून आले. स्टेशन मास्तरांनी पोलीस प्रशासनाला बोलावून पंचनामा करून मृतदेह ताब्यात दिला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
सुभाष दुधाळ यांनी कौटुंबिक कारणातून टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समजत आहे. दुधाळ यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधे त्यांनी कारण सांगितलं. पुणे उखऊ च्या एजथ विभागात पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत होते. पोलीस दलातील अंतर्गत कलहाचंही त्याच्यावर होतं प्रेशर अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
एका प्रकरणात,चुकीचा तपास आणि कर्तव्यात कसूर केल्याचा, त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. हा ठपका चुकीचा असल्याची चर्चा होतीच, त्यामुळेही सुभाष दुधाळ अस्वस्थ होते. याशिवाय कौटुंबिक कारण असल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिल्याने खळबळ उडाली आहे.

