लाच घेताना तलाठी पकडला

Beed

चौसाळा/बीडसत्ताप्रतिनिधी
दिवसेंदिवस लाच खोरीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत . अनेक माध्यमांतून, अनेक प्रकरणांमध्ये असे गुन्हे उघडकीस येत आहेत. यामध्ये बीड तालुक्यातील चौसाळा याठिकाणी आज लाच प्रतिबंधक पथकाने एका तालाठयास 15 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे . नावावर जमिन करुन देण्याच्या प्रकरणात ही लाच घेतली आहे असे समजते आहे .
या प्रकरणात लाच प्रतिबंधक पथकाने तलाठी कनेहरकर व साथीदार दिगंबर गात या दोघांना ताब्यात घेतले आहे.