स्थानिक गुन्हे शाखेने छाप्यात करोडोंचा गांजा केला जप्त

 शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत असलेले रेकलीयापाणी धरण परिसरात  कोट्यावधीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक यांना गुपित माहिती मिळाली की, गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे झाडांची अवैधरित्या लागवड व सुका गांजा बेकायदेशीर विक्री करण्याचे उद्देशाने लपवुन ठेवलेला आहे. माहितीच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, धुळे यांनी पोनिरी. दत्तात्रय शिंदे यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.  आतापर्यंत कोट्यावधीचा गांजा जप्त करण्यात आला आहे व अजून कारवाई सुरू आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुपित माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांनी छाप्याचे नियोजन करुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शिरपुर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने दि. 27 रोजी पहाटे छापा टाकला असता, रेकलीयापाणी धरणाचे वाहते पाण्याचे बाजुस व कोरडया भागात वेगवेगळया तीन ठिकाणी, अंदाजे 2 ते 3 एकर परिसरात अंदाजे 5/7 फुट कमी अधिक उंचीचे गांजी झाडे लागवड केल्याचे आढळून आले आहे. तसेच धरणाच्या बांधाच्या कडेला अंदाजे 100 ते 120 किलो पर्यंत सुका गांजा मिळुन आला आहे. अशाप्रकारे अंदाजे करोडोंचा ओला व सुका गांजा मिळुन आला आहे.