मांजरसुंबा ते पाटोदा रोडवर अपघातात एक ठार


सकाळी महामार्गावर फिरत असतांना अज्ञात वहाने उडवले
मांजरसुंबा दि.21/बीडसत्ताप्रतिनिधी
आज बुधवार (दि.21) रोजी पहाटे मोकळ्या हवेत फिरायला जात असलेल्या ग्रामस्थांना अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश येथील हाँटेल समोर रस्त्याच्या कडेला गणेश एकनाथ भोसले (वय 25, रा.पिंपळवाडी, ता.बीड) मृतावस्थेत आढळून आला.सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी नेकनूर पोलिस प्रशासनाला फोनवरून याची माहिती दिली.
माहिती मिळताच घटनास्थळी सपोनी चंद्रकांत गोसावी, उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, गोविंद राख, लिंबागणेश पोलिस चौकीचे पोहेकॉ. संतोष राऊत, बाबासाहेब डोंगरे, नवनाथ मुंडे यांनी भेट देऊन स्थळपंचनामा केला. हाटेल चे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत सदरील युवकाचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत असून शवविच्छेदनासाठी प्रेत लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि चंद्रकांत गोसावी करत आहेत.

