बीड - परळी रस्त्यावर रस्ता रोको

बीडसत्ता/प्रतिनिधी -- मराठा आरक्षणा प्रश्नी महाराष्ट्र राज्याचे बंद असलेले पडसाद आज बीड तालुक्यातील बीड परळी रस्त्यालगत असलेल्या जरुड या ठिकाणी उमटले आहेत .
बीड परळी रस्त्यावर आज मराठा बांधवांकडुन जरुड या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला आहे .
राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील उपोषण आंदोलन सुरू केले आहे . याचेच समर्थन म्हणुन आज महाराष्ट्रात बंदची हाक समाज बांधवांनी दिली होती. याच पार्श्वभूमीवर आज जरूड परिसरातील मराठा समाज बांधवांनी बीड परळी रस्त्यावर रस्ता रोको केलेले पहायला मिळते आहे .या रस्ता रोकोमुळे बीड परळी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत .
तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा, शिरुर , आष्टी,केज, अंबाजोगाई,धारुर,परळी,वडवणी, माजलगाव नेकनूर ,शिरसाळा,दिंदरूड,कडा या ठिकाणी देखील बंद हाकेला उस्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे .

