टु व्हिलरच्या धडकेत महिला जागीच ठार

खुर्द खांडवी :-अकोला खुर्द खांडवी रोडवर टु व्हिलर ने दिलेल्या धडकेत अकोला खुर्द येथील इंदुबाई पुंजाजी हेलोडे वय 60 यांचा जागीच मृत्यू झाला झाल्याची घटना 9 फेब्रुवारी रोजी अकोला खुर्द रोडवर घडली.
याबाबत मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार इंदुबाई अकोला खुर्द-खांडवी रोडवर गावाच्या लगतच ह्या बकर्या चारत होत्या. दरम्यान खांडवी वरून भेंडवळ कडे भरधाव वेगाने जात असताना अकोला खुर्द गावाजवळ रोडनजीक इंदुबाई ह्या बकर्या चारत होत्या.बकर्यांना हाकलन्यासाठी त्या रोड कॉस करतांना त्यांना दुचाकीने उडवून दिले.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

