बीडच्या बाजीराव चव्हाण यांची सरकारचे दूत म्हणून मध्यस्ती मोलाची- अजय सुरवसे 

Beed

बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
 मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातुन आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरावरील सराटी या गावचे मनोज जरांगे पाटील यांनी मागील 5-6 महिन्यांपासून संघर्ष केला.याला शुक्रवारी मध्यरात्री महाराष्ट्र शासनाने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने यश आले आहे .या लढ्यात बीडचे शिवसेना युवा नेते बाजीराव चव्हाण यांनी देखील मोलाची कामगिरी बजावली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मागील 5-6 महिन्यांपासून मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातुन आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष सुरू केला . त्याला शुक्रवार दि.27 जानेवारीच्या मध्यरात्री यश आले . महाराष्ट्र शासनाने त्यांच्या सर्व मागण्या केल्या आहेत. त्यांच्या या लढ्यामध्ये शासन व जरांगे पाटील यांच्यामध्ये वेळोवेळी मध्यस्ती करणारे  मुख्यमंत्री यांचे विश्‍वासू व मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह बीड चे आरोग्य दुत बाजीराव चव्हाण यांनी  मोलाची कामगिरी बजावली आहे. याच बरोबर मुंबई येथे उपोषणासाठी जाणार्‍या मनोज जरांगे पाटील यांची लोणावळा या ठिकाणी इतर शिष्टमंडळासह बाजीराव चव्हाण यांनी भेट घेतली व बैठकीमध्ये दुत म्हणून भुमिका पार पडली.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांनी ज्यावेळी मराठवाडा दौरा सुरू केला त्यादरम्यान बीड येथे झालेल्या इशारा सभे वेळी देखील या यांनी सर्व मागण्या समजुन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यंत पोहोचत केल्या अशी माहिती युवासेनेचे जिल्हाप्रमुख अजय सुरवसे यांनी दिली.अश्या या  मराठा आरक्षण लढ्यामध्ये  चव्हाण यांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे .