मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या होणार्या सर्वेमध्ये मुस्लिम समाजाने जास्तीत जास्त नोंदी कराव्या-प्रा. इलियास इनामदार

बीड/बीडसत्ता प्रतिनिधि
राज्यभरात राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येत असलेल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गासाठी मिशन सर्वेक्षण मोहिमेस 23 जानेवारीपासून सुरुवात होत असून 31 जानेवारी पर्यंत होणार आहे. राज्यातील मुस्लिम समाजाने मिशन सर्वेक्षण मोहिमेमध्ये जास्तीत जास्त नोंद करावी असे आव्हान लोकसेना प्रमुख ड. प्रा. इलियास इनामदार यांनी केले आहे.
सविस्तर असे की मिशन सर्वेक्षण मोहीम ही डिजीटल स्वरूपात असल्याने याच्या नोंदी थेट राज्य मागासवर्ग आयोगाकडे जमा होणार आहेत. देशात व राज्यात मुस्लिम समाजाचे शासनाकडून अनेक सर्वे झालेले आहे जसे न्या. सच्चर समिती, न्या. रंगनाथ मिश्रा आयोग, न्या. महेमूदूर रहेमान समिती व अशा अनेक समिती आयोगाने देशात व राज्यात मुस्लिम समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक सर्वे केलेले असून प्रत्येकाने आपल्या अहवालामध्ये मुस्लिम समाज दलित आदिवासी समाजापेक्षा मागासलेला आहे अशी रिपोर्ट अनेक वर्षापूर्वी दिली तरी पण गेंडयाच्या कातळीच्या सरकारने आजतारखे पर्यंत मुस्लिम आरक्षण जाहिर केलेले नाही अशात राज्यातील खुल्या प्रवर्गात येणार्या मुस्लिम समाजाला ही सोनेरी संधी उपलब्ध झालेली आहे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यास भविष्यात राज्य मागास आयोगाच्या अहवालाची गरज पडू शकते म्हणून राज्यातील मुस्लिम समाजाने मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या होणार्या सर्वेमध्ये मुस्लिम समाजाने जास्तीत जास्त नोंद करावी सोबत मुस्लिम सामाजिक संघटना जसे तब्लीक जमात, जमियत उलेमा हिंद, जमाते इस्लामी, अहले हदीस, अहले सुन्नत जमात, उलेमा कॉन्सिल, सर्व उर्दू शिक्षक संघटना, मुस्लिम ओबीसी संघटना कामगार पेंटर, विविध सामाजिक संघटना सर्व पक्षाचे अल्पसंख्याक सेल, माजी आजी भावी नगरसेवक पदाधिकारी यांनी या सर्वेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी समाजाला मदत करावी व जास्तीत जास्त नोंद करुन घ्यावी असे आव्हान लोकसेना प्रमुख ड. प्रा. इलियास इनामदार यांनी केले आहे.

