सातत्य पूर्ण काम केल्यास यश निश्‍चित प्राप्त होते-दिपक घुमरे

Georai

गेवराईत द.बा.घुमरे पब्लिक स्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न 
गेवराई/बीडसत्ता प्रतिनिधी
     सध्या स्पर्धेचे युग आहे स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेवून सराव केला पाहिजे. त्यामुळे  शिक्षणाबरोबरच बौध्दिक विकास होतो. तर द.बा.घुमरे पब्लिक स्कूलमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेवून गुणवत्तापुर्ण शिक्षण दिले जाते विध्यार्थानी सातत्य पूर्ण अभ्यास करावा कोणतेही काम सातत्य पूर्ण केल्यास यश निश्‍चित प्राप्त होते असे प्रतिपादन दिपक घुमरे यांनी व्यक्त केले. 

      कै.वंचळाबाई घुमरे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित द.बा.घुमरे पब्लिक स्कूल, गेवराई येथे बुधवार दि.24 जानेवारी रोजी शिक्षक ,विध्यार्थी पालक मेळावा व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दिपक घुमरे तर प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ शिक्षण संस्थेचे सचिव सुभाषराव पवळ, सा.गौरापूर दर्शनचे संपादक शिवाजीराव ढाकणे, दै.लोकप्रभाचे उपसंपादक काझी अमान, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष तथा दैनिक लोकाशाचे तालुका प्रतिनिधी विनोद पौळ, पालक प्रतिनिधी दिलीप सोनवणे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक घुमरे एस.के.
माध्यमिकचे मुख्याध्यापक आमरुळे एम.बी.यांच्या सह माता-पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       पालक मेळाव्यात शाळेचे मुख्याध्यापक सतिश घुमरे यांनी शाळेचा कार्यअहवाल सादर करुन वार्षीक आढावा पालकांसमोर मांडला. पालक मेळाव्यात पत्रकार शिवाजीमामा ढाकणे, जेष्ठ पत्रकार काझी अमान, दिलीप सोनवणे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.  
   अध्यक्षीय समारोप प्रसंगी पुढे बोलताना दिपक घुमरे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळेत प्रयत्न केले जातात. परंतू विद्यार्थ्यांच्या आधिक गुणवत्तेसाठी पालकांनीही लक्ष दिले पाहिजे. बेसिक पुर्ण झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनीही विविध स्पर्धा परिक्षेत सहभाग नोंदवला पाहिजे. स्पर्धा परिक्षेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो.दरम्यान यावेळी हिरकपंख परीक्षा, खपींशीपरींळेपरश्र चरींहशारींळली ेश्रूाळिरव, णपळषळशव ेश्रूाळिरव ,गुरुकूल प्रज्ञाशोध परीक्षा, एपसश्रळीह जश्रूाळिरव, शालेय क्रीडा स्पर्धा, लोकमतच्या घे उंच भरारी, कब बुलबुल, प्रधानमंत्री पोषण शक्ती पाककृती स्पर्धा, गणेश मूर्ती कार्यशाळा, गणपती पोस्टर स्पर्धा, पुष्पगुच्छ स्पर्धा, तहसील कार्यालय गेवराई, अमृत महोत्सव निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रथम क्रमांक, यासह शाळेतील विविध स्पर्धेत सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. दरम्यान यावेळी शेख सदक, दिक्षित तन्वी, येवले मनुष्का, पवळे सोनाली, येवले भावना, येवले ईश्‍वरी, शेख हिबाअनम, घुमरे श्रेया, घुमरे आर्या, सोनवणे मधुरा  या चिमुकल्यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमरुळे सर यांनी तर सुत्रसंचलन शिंदे एज.जे व आभार प्रदर्शन थिटे सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.