आज पासून श्रृंगेरी देविच्या यात्रेला सुरूवात

Ashti

आष्टी तालुक्यातील भाविक भक्त येतात हजारोच्या संख्येने दर्शनाला
कडा / बीडसत्ता प्रतिनिधी
तालुक्यातील ब्रम्हगाव नजिक असणार्‍या शृंगेरी देवीची यात्रा पौष्ष पोर्णिमा म्हणून दिनांक 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तब्बल पंधरा दिवस चालणारी ही यात्रा आष्टी पाटोदा सह परिसरातील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील उंच डोंगरावर शृंगेरीदेवी हे पंचक्रोशीतील जागृत देवस्थान आहे.  शृंगेरी देवी गडावर वर्षभरात विविध उत्सव साजरे केले जातात .नवरात्र उत्सवाबरोबर पाऊस पौर्णिमेला भरणारा यात्रा उत्सव ही आकर्षण असते. या वर्षाचा यात्रा उत्सव आज दिनांक 25 जानेवारी पासून सुरू होत आहे. हा यात्रा उत्सव पंधरा दिवस चालतो. शुक्रवार दिनांक 26 जानेवारी रोजी शृंगेरी देवीची गडावर कुस्त्याचा आखाडा भरणार आहे.या आखाड्यात राज्यभरातून नामवंत मल्ल हजेरी लावतात यात्रा उत्सवाच्या पंधरा दिवसाच्या काळात लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतात.पंधरा दिवस चालणारे यात्रेसाठी आष्टी आगारातून ज्यादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात येते.मंगळवार शुक्रवार आणि इतर दिवशी येणार्‍या गर्दीच्या प्रमाणात जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.