मुख्यमंत्री दिव्यांगाबाबत बेफिकीर असून दिव्यांग मंत्रालय वार्यावर सोडलं-डॉ जितेंद्र ओव्हाळ

गाढव मोर्चा काढण्याचा दिला इशारा
बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
दिव्यांग मंत्रालय हे टक्केवरीच्या नशेत कामं करत असल्याचा दावा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी बुधवारी केला
. दिव्यांग शाळाना अनुदान देण्याच धोरण गेल्या दहा वर्षांपासून ठरवण्याची जबाबदारी या सुदृढ अधिकार्यावर आहे दिव्यांगचं धोरण आज सुदृढ अधिकारी ठरवत असताना थेट दलालीची अपेक्षा करतात लाज वाटणारी गोष्ट आहे या राज्यचा मुख्यमंत्री दिव्यांगाबाबत बेफिकीर असून दिव्यांग मंत्रालय वार्यावर सोडलं आहे दिव्यांगासाठी दिव्यांग मंत्रालय काम करणार नसेल अनुदान धोरण करणार नसेल दिव्यांग शाळा कर्मचारी यांना न्या देणार नसेल तर सचिव अभय महाजन कोणत्या अधिकारांना कारभार करता असा सवाल उपस्थित करत अनेक वेळा आंदोलनं करून शेकडो घोटाळे पुढे आणले काय कारवाई केली उपसचिव घोडके बिनबुडाचे आदेश काढत असताना धोरनाचं काय अनुदान कधी देणार दिव्यांगचं धोरण कुठे आहे याचा खुलासा दोन दिवसात सचिव अभय महाजन यांनी करावा असे आव्हान डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केले नसता आता गाढव मोर्चा तून 26 जानेवारीला जाब विचारणार असल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी बुधवारी दिली

