उपविभाग अधिकारी कार्यालयात एसीबीची धाड

Majalgaon

लिपिक वैभव जाधवला अटक

माजलगाव/बीडसत्ता प्रतिनिधी
    पकडलेल्या वाळूचा ट्रक परत सोडविण्यासाठी तीस हजाराची लाच मागितल्या प्रकरणी माजलगाव प्रांत अधिकारी कार्यालयातील कारकून वैभव जाधव यास लाच घेताना रंगेहाथ पकडले, तर उपविभागीय अधिकारी चालकाच्या दुचाकीवर बसून गेल्या. 

    दरम्यान या संबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील पथकाने संपूर्ण चौकशी सुरू केली असून यातील एका आरोपीस पकडण्यात आले आहे. या लाच प्रकरणात उपविभागीय अधिकारी यांच्या सहभागा विषयी पोलीस अधिकचा तपास करत असून ठिकठिकाणी पथकाने चौकशी सुरू केली आहे.    या संबंधी माजलगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे प्रक्रिया सुरू आहे.