बीडमध्ये शिवसैनिकांकडून शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Beed

बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अवघ्या राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या आनंदत्सवात साजरी करण्यात येत आहे. अगदी याप्रमाणेच बीड जिल्ह्यात देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा तरुणांमध्ये उत्साह पाहावयास मिळत आहे. 

 दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजताच्या दरम्यान बीड शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी अनेक शिवसैनिक एकत्रित आली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रत्येक शिवसैनिकाने बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी किशोर जगताप,सुनील सुरवसे,प्रदीप माने,नवनाथ शिंदे,लक्ष्मण ठाकूर,मुकेश शिवगण,गणेश लोणकर,गणेश काळे,अनिकेत नाटकर,भारत देवकते,गणेश भांडवले,नामदेव वांडरे,चंदू काळे,नामदेव म्हेत्रे,हनुमान पांडे व शिवसैनिक उपस्थित होते.