शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी अनिल जगताप

बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी आता अनिल जगताप यांच्याकडेही देण्यात आली आहे.मुंबईत मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी (दि.23) रोजी जगताप यांच्या नियुक्ती पत्र देण्यात आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने निवडी जाहीर केल्या यामध्ये बीड शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी जगताप यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना बीड व माजलगाव विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी उपस्थितीत विधान परिषदेच्या सभापती निलमताई गोरे, शिवसेना सचिव संजय मोरे,मंत्री दादासाहेब भुसे ,जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्यासह पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते.

