राम नामाच्या जयघोषात दुमदुमली चंपावती नगरी ...



ग्रामीण भागात घरोघरी गुढ्या उभारून केला गेला आनंदोत्सव साजरा ...
बीड/बीडसत्ता युवापत्रकार
आज अयोध्या या ठिकाणी भगवान रामच्या प्राणप्रतिष्ठा मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.हा आजच्या आनंदाचा दिवस पूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच अनुशंघाने आज बीड या ठिकाणी रामभक्तानी राम मूर्तीची मिरवणूक काढली होती . या मिरवणुकीमध्ये अनेक जाती धर्माच्या रामभक्तानी व तसेच महिलांनी देखील मोठ्यांसखाने सहभाग नोंदवलेला होता . हा आनंदउत्सव ग्रामीण भागात देखील बगायला मिळाला . ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या घरावर्ती गुडी उभारून हा उत्सव सागर केले आहे .
अयोध्या या ठिकाणी मागील अनेक दिवसांपासून चालू असलेल्या राम मंदिराचे अखेर काम पूर्ण झाल्यानंतर .शश्त्रातल्या विधी प्रमाणे आज या मंदिरात भगवन राम प्राणप्रतिष्ठा मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे . आज याच अनुशंघाने बीड शहरामध्ये रामभक्तांकडून मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली होती . या मिरवणुकी वेळी अनेक बाल गोपाळांनी श्रीरामाचे रूप धारण केलेले बगायला मिळाले होते . याच बरोबर ढोलपतक , टिपर्या , लेजीम , टाळ मृदूंग व वेगवेगळ्या वेष भुशेत नटलेली बाळ गोपाळ होती. हा प्राणप्रतिष्टेचा आनंद उत्सव ग्रामीण भागात देखील मोठ्या वसाहत आयोजित करण्यात आला होता . यामध्ये ग्रामीणभागातील महिलांनी आपल्या घरावरती गुडी उभारून हा आनंद उत्सव जसार केला होता. तसेच वारकरी संपद्यातील भक्तांनी गावभरामध्ये कलश निर्वनीक व अभंगाच्या जय घोषात साजरा केला .
अशी साकारली बाल कलाकारांनी रूपे 
बीड शहरात झालेल्या या आनंद उत्साहात शहरातील अनेक बालकरकारी रामायणातील अनेक वेग वेगळी रूपे आवतरली होती . या रूपांचा मोह अनेकांना भारावून टाकताना दिसून येत होता . या कलाकृतीमध्ये ग्रामीण भागातील देखील कलाकारांनी हि पुढील रूपे आवतरली होती . यामध्ये पवनपुत्र हनुमान ,रामावर अविरत प्रेम करणारी शबरी माता व राम , सीता ,लक्ष्मण अशी जिवंत रूपे या वेळी शहरातील भक्तांना भगव्याशी मिळाली . तसेच या बाल प्रभुना रथामध्ये विराजमान करत शहरातील मुख्य रस्त्यावर प्रदर्शित करण्यात आली होती.
ढोल ताशाच्या गजरात रामल्लाचे स्वागत
शहरात झालेल्या या मिरवणूकित मुख्य आकर्षण भक्तांना अनुभवायला मिळाले . या मिळवणुकीवेळी बीड शहरात खास नावारूपाला आलेले जिजाऊ धर्मयोद्धा हे ढोलपतख हे मुख्य आकर्षण होते . अगदी टालभद् वाद्य यावेळी भक्तांना आनुभवयास मिळले होते . या ढोलपटकाचे आवाजावर मिरवणुकीतील अनेक महिला बहिणींनी आनंद लुटताना दिसून आल्या होत्या. ढोल पतखा बरोबरच साऊंड सिस्टम चा देखील या मिरवणुकीमध्ये सहभाग होता . या साऊंड सिस्टम वर तरुण भक्तांनी चांगलाच जलोष साजरा केलेले दिसला.
मिरवणुकीत सेवा धर्माचे दर्शन 
बीड शहरात काढलेले या मिरवणुकीतील भावीक भक्तना अनेक मित्रमंडळांकडून सेवा देण्यात आली होती . शहरातील अनेक मित्रमंडळाच्या वतीने मिरवणुकीतील भक्तांना पाणी बॉटल्स व केळीचा अल्पउपहार देण्यात आला होता .तसेच उपवास ठेवणार्या मंडळींना साबुदाणा खिचडीचे देखील वाटप करण्यात आले होते . तसेच या मिरवणुकी वेळी उष्मघाताने कोणाला काही त्रास झाल्यास वैधकीय मदत तात्काळ मिळावी यासाठी एक आंबलून्स देखील या मिरवणुकी वेळी तेनात करण्यात आली होती.

