आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही



मनोज जरांगे पाटील यांची मुंबईकडे आगेकूच
बीड / बीडसत्ता
मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली वेळ संपल्या नंतर देखील सरकार मागण्या मान्य करताना दिसून येत नाही .मागील गेली अनेक दिवसापासून सरकार मधील नेते फक्त वेळकाडू पण करताना दिसले आहेत. बीड येथील झालेल्या सभेमधून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 20जानेवारी ही तारीख दिली होती ही तारीख आज पूर्ण होत आहे.20जानेवारीपर्यंत सरकारने आरक्षणाबाबतीत कसलाही निर्णय न घेतल्याने आज मनोज जरांगेंसह लाखो मराठा समाज बांधव मुंबईकडे आगेकूच करत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी गेली अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरल्याने महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधव आज एकवटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जात आहेत.
सरकार हे देखील प्रत्येक विभगातील कर्मचार्र्यांना असे सांगितले आहे की, मराठा बांधवांचे दाखले शोधण्यास सांगिलते व पूर्ण महाराष्ट्रातुन लाखोंच्या संख्येने हे दाखले मिळाले देखील आहेत.मात्र या मागणीला सरकारकडून अध्यपही कोणताही प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. 20 जानेवारी पर्यंत आरक्षणांवर कोणताही तोडगा काढलेला नव्हता म्हणून या विषयावर तोडगा न निघाल्याने आज मनोज जरांगे पाटील हे लाखोंसंखेने मराठा बांधव सोबत घेऊन आज पासून मुंबईकडे आगेकूच केली आहे.
एक ते दोन महिण्याचे राशन सोबत
अनेक वर्षांपासून मराठा समाज लोकशाही मार्गाने मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे परंतु सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यामुळे समाजामध्ये सरकारविरोधात तिव्र भावना निर्माण झाल्या आहेत. याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईवारीची घोषणा केल्यानंतर या वारीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे एक ते दोन महिना जाईल एवढे दैनदिन गरजेचे साहित्य सोबत घेवून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.वाहनामध्ये राहण्याची,पाण्याची सोय या मराठा बांधवांनी केली आहे.
एमआयएमकडून पाडळसिंगी टोलनाक्यावर अल्पोपहार
मनोज जरांगे पाटीलांसह लाखो मराठा बांधव मुंबईकडे जाणार असल्यामुळे एमआयएमकडून पाडळसिंगी टोलनाक्यावर अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.मुस्लिम समाज नेहमीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मराठा समाजाला मदत करताना दिसून येत आहे.आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांना पायी मुंबईकडे जाणार आहेत हे पाहून पाडळसिंगी टोलनाक्यावर एमआयएमच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक भाऊसह त्यांच्या टीमने मराठा बांधवांना अल्पोपहार दिला.
असे असेल मुंबई दौर्यांचे स्वरूप
या मुंबई पदयात्रेची सुरवात मनोज जरांगे पाटील यांच्या गावातून म्हणजेच आंतरवली सराटी याठिकाणाहून होईल दुपारी भोजन हे कोळगाव ता. गेवराई या ठिकाणी असेल व रात्रीचा मुकाम हा मातोरी या ठिकाणी असेल . 21 जानेवारी मातोरी ते कांजी घाट दुपारी भोजन तनपूरवाडी , 22 जानेवारी बाराबाभळी ते रांजणगाव दुपारी भोजन सुपा ,23 जानेवारी रांजणगाव ते चंदननगर ते खराडी बायपास दुपारी भोजन भीमा कोरेगाव ,24 जानेवारी खराडी बायपास ते लोणावळा दुपारी भोजन तळेगाव ,25 जानेवारी लोणावळा ते वासी दुपारी भोजन पनवेल ,26 जानेवारी वासी ते आझाद मौदान मुंबई असे हे ऐकून 6 दिवसाचे स्वरूप असेल .

