श्री क्षेत्र सोमेश्‍वर मंदिराचा परिसर साफसफाई करून स्वच्छ केला

Beed

भाजपा जिल्हाध्यक्ष राजेेंद्र मस्के व भाजपा जिल्हा सचिव नवनाथ शिराळे यांनी आरती केली 
बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठेकरिता काहीच दिवसांचा कालावधी बाकी आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर व पुजास्थळांची स्वच्छता करण्यात येत आहे. 

आज माझ्या बीड विधानसभा मतदारसंघातील श्री क्षेत्र सोमेश्‍वर संस्थान बीड शहरा मधील मंदिरात दर्शन घेऊन मंदिर परिसराची साफसफाई करून आरती केली.
यावेळी बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,भाजपा जिल्हा सचिव नवनाथ अण्णा शिराळे, जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रकांत फड, दत्ता भाऊ थिगळे,,श्री बालाजी पवार, श्री बाबुराव परळकर, पांडुरंग जानवळे, प्रधान पवार, बाबासाहेब शिंदे,हजारे मामा, बापूराव धांडे, सदाशिव शेजाळ, हनुमंत गायकवाड,अजय ढाकणे, विकास गव्हाणे, बदीनाथ जटाळ, सह इतर सहकारी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. 
प्रभू श्रीरामांच्या आगमनाने संपूर्ण देशात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. आपली श्रद्धास्थाने म्हणजे मठ, मंदिरे, तीर्थक्षेत्र हे आपले मानबिंदू आहेत. आपण आपल्या मनाच्या शुद्धीसाठी देव दर्शन करतो. त्यामुळे मंदिर परिसराची स्वच्छताची ही देखील तितकीच पवित्र आहे. यामुळे माननीय मोदीजींनी याचेच महत्त्व ओळखून प्रभू श्रीरामांच्या आगमनाच्या अनुषंगाने मंदिर परिसर स्वच्छतेवर भर दिला आहे. त्यामुळे आपण कोणत्याही धर्माचे, पंथाचे वा संप्रदायचे असाल; तरी देखील आपल्या पुजास्थळी जाऊन या स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा असे मी आवाहन करतो.