दिव्यांग मंत्रालयायावर गाढव मोर्चा काढणार-डॉ जितेंद्र ओव्हाळ

बीड/ बीडसत्ता प्रतिनिधी
दिव्यांग आयुक्त पुणे यांच्या कार्यालयांसमोर गेल्या तीन दिवसापासून कार्यकर्त्यांचे उपोषण चालु होते तरी आयुक्तांनी उपोषकर्त्यांना लेखी पत्रावर अश्वासन देवून गुरुवारी उपोषण मागे घेण्यात आले.
महाराष्ट्रातील अनेक विनाअनुदानित दिव्यांग शाळाना अनुदान देणायसाठी धोरण फाईल तातडीने मंजूर करा, सफाईगार मदतनीस पाहारेकरी यांना समान वेतन देऊन जीवघेणी निर्णय रद्द करा, दिशा प्रकल्पाची हलि धाकवा
सामायोजन पूर्ण करा 7पे चा निधी वितरित करून थकीत वेतन द्या या व इतर मागण्यासाठी शेकडो कार्यकर्ते उपोषण करत होते आयुक्त पुरी यांनी उपोषण सोडण्याची विनंती करत मागण्या शासनाला पाठवल्या येत्या दोन दिवसात शासनाने अनुदान धोरण फाईल मंजूर करावी सफाईगर पाहारेकरी मदत्तनीस या कर्मचाऱयांना समान वेतन न दिल्यास दिव्यांग दिव्यांग आयुक्त कार्यालयची प्रतिमातमक प्रतिमा गाढवाच्या गळ्यात बांधून दिव्यांग मंत्राल्यावर हजारो दिव्यांग मुले व कार्यकर्ते बरोबर घेऊन 26 जानेवारीला मुंबईत गाढव मोर्चा काढण्याचा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी पुणे येथून गुरुवारी दिला या वेळी बहुजन शिक्षक संघटनेचे भाऊसाहेब कांबळे रावसाहेब कांबळे मनीष जाधव दिलिप जेटे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

