गेवराई कृषी विभागाच्या पुढाकाराने चार दिवसिय रेशीम प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Beed

गेवराई / बीडसत्ता प्रतिनिधी 
गेवराई येथील कृषी विभागाच्या वतीने म्हैसुर सशोधन केंद्रामध्ये शेतकर्‍यांना रेशीम व्यवसायचे आधुनिक चार दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. . या चारदिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये रेशीम व्यवसाय शेतकर्‍यांनी कशापद्धतीने करावा तसेच रेशीम तयार करणार्‍या आळीची कशा पद्धतीने निगा राखावी , तुतीच्या रोपांची लागवड किती अनंतराव करावी अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षण शेतकर्‍यांना देण्यात आले होते.

गेवराई तालुक्यातील रेशीम उद्योगाचा विस्तार वाढत असल्याने अनेकांना त्यातील तांत्रिक बारकाईची माहिती हवी असते त्यामुळे शेतकर्‍यांना म्हैसुर येथील केंद्रात रेशीम संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या विभागामार्फत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते . या प्रशिक्षणाचा शेतकर्‍यांना लाभ होईलच शिवाय यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा आपल्या भागातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन मिळेल असल्यास चांगल्या प्रकारे उत्पादन घेणे शक्य होईल . व उत्पादन वाढल्यास शेतकर्‍याला आर्थिक टंचाई भासणार नाही . असा या प्रशिक्षण मागील हेतू होता . या चार दिवसीय प्रशिक्षणासाठी  रंगनाथ परमेश्‍वर भुसे.रा. कोल्हेर , भागवत खेत्रे. रा.वाहेगाव, ज्ञानेश्‍वर राऊत.रा.वाहेगाव, महेश ढोणे.रा.गवराई ,ज्ञानेश्‍वर वाघमारे.र ा.गेवराई, वैजनाथ शिंदे, रामेश्‍वर राहुल घोडके.रा. गेवराई या सर्व शेतकर्‍यांची या चार दिवसीय प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती .