मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही - गणेश बजगुडे

बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
बीड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा शिवक्रांती संघटनेचे संस्थापक गणेश दादा बजगुडे पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी 18 जानेवारी रोजी वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाने आयोजित केला जात असतो परंतु यावर्षी मराठा आरक्षण व मराठा आरक्षणासाठी झालेल्या आत्महत्या लक्षात घेता मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत वाढदिवस साजरा करणार नसल्याची माहिती गणेश दादा बजगुडे यांनी कळवली.
गणेश बजगुडे हे मराठा आरक्षण लढ्यातील एक सक्रिय नेते असुन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांच्या नेतृत्वात छावा व शिवक्रांती संघटनेच्या माध्यमातून अनेक लक्षवेधी आंदोलने झालेली आहेत. बीड येथे रस्ता रोको, मोर्चा, निदर्शने, बीएसएनएल टॉवरवर भल्या पहाटे चढून केलेले आंदोलन असेल किंवा मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण देखील त्यांनी केलेले आहे. 2017 मध्ये शिवक्रांती संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षण व शिवस्मारकाच्या विषयावर मराठवाड्यात मराठा जागर अभियान देखील त्यांनी राबवले होते. आरक्षणाच्या मागणीसाठी काठ्या लठ्या कारावासही भोगलेला आहे. 2003 ते आजतागायत यामागणीसाठी सक्रियपने काम करत असल्याने सामाजिक जान व भान ठेवून त्यांनी वाढदिवस येतील जातील परंतु आरक्षणाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे हे आंदोलन कुठेही भरकटू नये त्याच बरोबर आमच्या काही सहकार्यांनी आरक्षण मुद्द्यावर आत्महत्या केलेल्या आहेत त्याच्या वेदना व दुःख कायम असल्या कारणाने आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत वाढदिवस साजरा नकरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गणेश दादा बजगुडे यांनी दिली.

