महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला लोकसभेच्या दहा जागा द्याव्या-अॅड.प्रा.इनामदार

बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
महाविकास आघाडीने (इंडिया गटबंधनाने) आपापल्या पक्षाच्या क़ोटयातून आपापल्याच उमेदवाराला राज्यातील कुलाबा ठाणे नाशिक औरंगाबाद बीड सोलापुरसह लोकसभेच्या दहा जागा देवून मुस्लिम समाजाला राजकीय वाटा म्हणून सामाजिक न्याय द्यावा नसता लोकसेना संघटना मैदानात उतरणार अशी मागणी लोकसेना प्रमुख ड. प्रा. इलियास इनामदार यांनी सोनिया गाँधी, राहुल गाँधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार उद्धव ठाक़रे, नाना पटोले यांना पत्राद्वारे केली आहे. येणार्या मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणूका होणार आहे आजपर्यंत देशातील अनेक पक्षाच्या सरकारने मुस्लिम समाजाला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रात अविकसित ठेवण्याचे षड़यंत्र रचले आहे देशातील लोकशाही धर्मनिरपेक्षता संपवून समाजावर जणू दुय्यम नागरिकता थोपण्याचा कटकारस्थान जातीयवादी भाजपामित्र पक्षाकडून रचला जात आहे असे त्यांच्या पक्ष नेत्यांच्या कृतितुन व वक्तव्यातुन सतत आपल्याला पहावयास मिळते, पंच्याहत्तर वर्षापासून समाज ज्या नेत्यांना सेक्युलर म्हणून निवडून देत आहे तेच नेते आज स्वार्थासाथी, निवडणूक टिकिट मिळविण्यासाठी, गुत्तेदारी मिळविण्यासाठी ईडीच्या भीतिने आपले भ्रष्टाचार झाकण्यासाठी जातीयवादी पक्षाच्या मांडीवर जाऊन बसत आहे हे लोकशाहीला काळीमा फासण्यासारखी लाजीरवानी गोष्ट आहे. कांग्रेसने अनेक वर्ष मुस्लिम समाजाच्या मतावर राजकारण केले परंतु ज्या पद्धतीने समाजाला कांग्रेस सरकार कडून न्याय मिळावा तसे मिळाले नाही देशातील मुस्लिम समाज हा दलित आदिवासी समाजापेक्षा मागासलेले जीवन जगत आहे. देशातील व राज्यातील मुस्लिम समाजाचे मागासलेपण दूर करायचे असेल तर समाजाला सामाजिक व राजकीय न्याय द्यावे लागेल व त्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार येणार्या लोकसभा व विधानसभेला उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरवून ईमानदारीने त्यांना निवडणूकीत निवडून आनावे लागेल तरच खरे न्याय मुस्लिम समाजाला मिळण्यास सुरुवात होईल नसता येणार्या प्रत्येक निवडणूकीत स्वतंत्र उमेदवार उभे राहणार असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांना लोकसेना प्रमुख ड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिला आहे.

