आजच्या पिढीने मैदानी खेळात सहभागी होणे काळाची गरज-खा.डॉ.प्रितम मुंडे

आ.सुरेश धस यांनी केले सचिन जायभायेचे कौतुक
शिरूर / बीडसत्ता प्रतिनिधी
शिरूर कासार तालुक्यातील शेरेवडी येथे रविवारी नमो चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आणि बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
यासाठी बीड जिल्हाच्या लोकप्रिय खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे आणि विधान परिषदेचे आमदार सुरेश आण्णा धस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघाला बक्षीसांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थितीत होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भारतीय युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, तथा संचालक, भारतीय खाद्य निगम भारत सरकार सचिन जायभाये यांनी केलं.
नमो क्रिकेट स्पर्धेत बीड, गेवराई, पाथर्डी आदी तालुक्यातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. मोदी सरकारच्या या संकल्पनेमुळे ग्रामीण भागातील तरुणांच्या कला-गुणांना वाव मिळाला असून तरुणांसाठी अशा नवीन संधी पक्षाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येतील, असं आवाहन यावेळी आ. सुरेश आण्णा धस यांनी दिलं.
यावेळी प्रितम मुंडे यांनी तरुणांना संबोधित केलं. त्यांनी मैदानी खेळाचं महत्त्व अधोरेखित करत तरुणांसाठी क्रिडांगणाच्या उभारणीसाठी भरीव निधी मिळवून देण्याची ग्वाही दिली. तथापी, यावेळी सचिन जायभाये यांनी क्रिडांगणाची मागणी करत जिल्ह्यात युवा वारियर्सच्या शाखा सुरू करण्याची संकल्पना मांडली.
या स्पर्धेत तागडगाव येथील संघाने प्रथम क्रमांक (21000 हजार) मिळवला. तसेच बारगजवाडी येथील संघाने द्वितीय क्रमांक (15000 हजार), चिंचपूर - तृतीय क्रमांक(11000 हजार) असे पारितोषिक पटकावले. तथापी, 13 जानेवारीला भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शेरेवाडी (पिंपळनेर फाटा) शिरूर कासार जि. बीड येथे ’नमो चषक’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सिद्धेश्वर संस्थानचे मठाधिपती अतुल शास्त्री महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, माजी आमदार भिमरावजी धोंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी शिरूर नगराध्यक्ष श्री. रोहिदास पाटील गाडेकर, पाटोदा नगराध्यक्ष राजू भय्या जाधव, भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश उगलमुगले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विवेकजी पाखरे, उप-नगराध्यक्ष श्री. प्रकाश देसरडा, जि.प.सदस्य रामराव खेडकर ,रामदास बडे ,शिवाजी पवार ,अभियंता कृष्णा पानसंबळ ,समाज कल्याण अधिकारी लक्ष्मण बारगजे ,प्रकाश खेडकर ,कल्याण तांबे ,बाळासाहेब केदार ,भरत खरमाटे ,वारणी सरपंच ज्ञानदेव केदार , तागडगांवचे सरपंच नवनाथ सानप ,मिथुन डोंगरे ,सुदाम काकडे ,दिलीप जायभाये पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते.या उपक्रमाचे नियोजन व सूत्रसंचलन संजय आघाव यांनी तर बारगजवाडी येथील युवकांनी पुढाकार घेत कार्यक्रम यशस्वी केला.

