युवा सेनेच्या वतीने मोफत रक्त व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

आसपाच्या खेड्यातील नागरिकांनी घेतला शिबीराचा लाभ
ढेकणमोहा/बीडसत्ता प्रतिनिधी
बीड जिल्हा युवा सेना जिल्हाध्यक्ष मा. अजय सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ढेकणमोहा राममंदिर सभागृह या परिसरात आरोग्य शिबीर संपन्न झाले .
या आरोग्य शिबीरामध्ये ढकणमोहा व आपसपाच्या खेड्यातील गरजुवंत नागरिकांनी सहभाग नोदवलेला दिसुन आला.बीड तालुक्यातील ढेकणमोहा या ठिकाणी युवा सेना बीड जिल्हाध्यक्ष अजय सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर संपन्न झाले .या शिबीरामध्ये नागरिकांच्या रक्त नमुन्यांची चाचणी करण्यात आली तसेच शरीरातील विविध आजारांवर उपाययोजना ची देखील चाचणी करण्यात आली होती.
या शिबीरामध्ये ढेकणमोहा तसेच परिसरातील एकुण 100 नागरिकांनी सहभाग नोंदविला होता . या 100 नागरिकांची या शिबिरामार्फत मोफत रक्त व आरोग्य तपासणी करणयात आली . या घेतलेल्या शिबीराबद्दल अजय सुरवसे यांचे नागरिकांकडून तोंड भरुन कौतुक केले जात आहे . यावेळी शिबिराला संपन्न करण्यासाठी सहकार्य लाभले यामध्ये गणेश भोगे, विकास थापडे, मुकुंद पवार, अर्जुन राठोड, दिलीप मुळे व सर्व शाखा पदाधिकारी होते .

