शहरात सुक्ष्म चिलटांचा धुमाकूळ

Beed

मोटार सायकल स्वारांनो कधीही होऊ शकतो अपघात
बीड/बीडसत्ता शहर प्रतिनिधी 
बीड शहरामध्ये सूक्ष्म चिलटांनी चांगलाच धुमाकूळ घातलेला दिसुन येत आहे. यावर नागरिकांनी आपल्या डोळ्यांची या चिलटपासून संरक्षण करावे.शहराच्या बाजुला असलेल्या परिसरातील रब्बी या हंगामातील ज्वारी या पिकाची काढणी सुरू आहे . शक्यतो असे सूक्ष्म चिलट हे या पिकावर जास्त आढळून येताता. चालू असलेल्या काढणीमुळे ज्वारी या पिकावरील हे चिलट शहरातील व जवळपासच्या गावात व परिसरात वावरत असल्यामुळे मोटार सायकल स्वार यांनी आपली गाडी चालवतांना डोळ्यावर पारदर्शक चष्मा तसेच हेलमेटचा वापर करावा आणि सूक्ष्म चिलटापासून बचाव करावा. 

या सूक्ष्म चिलटानपासुन डॉक्टरांनी आपल्या डोळ्यांची निगा राखण्याचे आवाहन केले आहे .हे चिलट डोळयात गेल्याने अनेक प्रकारांच्या डोळ्यांच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. चिलटांचे प्रमाण शहरात व खेड्या गावात व परिसरात वाढल्याने वाहन चालवत असताना हे चिलट डोळयात गेल्याने रस्तावर अपघात होवू शकतो तसेच डोळ्यांचे विविध आजारही होवू शकतात.
या अशा नैसर्गिक संकटावर कोणत्याही प्रकारचा मार्ग निघणारा नसतो . तेव्हा शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी शेतातील कामे किंवा प्रवास करताना आपल्या डोळ्यांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक चष्मा व हेलमेट वापरणे ही या संकटावरील योग्य खबरदारी असू शकते.

------------------

चिलटाचे डोळ्यावर इन्फेक्शन झाल्यास कायमचे अंधत्व येवू शकते
हे सूक्ष्म चिलट डोळयात गेल्याने डोळयामधील विविध भागांमध्ये गंभीर इजा निर्माण करु शकतात,डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होवू शकते, तसेच कॉर्नियाला इजा होऊन जखम निर्माण होऊ शकतो ही जखम चिघळल्यानंतर कायम अंधत्व देखील येऊ शकते.असे चिलट डोळयात गेल्यास डोळे थंड पाण्याने धुवून घ्यावेत जर डोळ्यांना काही त्रास जाणवत असेल तर तात्काळ नागरिकांनी नेत्रतज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.
नेत्ररोग तज्ञ डॉ.एकनाथ पवार(श्री.सिद्धीविनायक नेत्रालय,बीड)

--------------------