मुख्याधिकारी अंधारेंची माहिती देण्यास टाळाटाळा-अॅड.इरफान बागवान

26 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार
बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
बीड नगरपालिकेत सीओ नीता अंधारे यांनी जेव्हापासून पदभार स्वीकारला आहे तेव्हापासून बीड शहरातील जनतेला सातत्याने साफसफाई पाणीपुरवठा तसेच विद्युत पथदिवे या समस्या सोडवण्यात त्या सपशेल अपयशी ठरल्या आहेत. आज बीड शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत असून महिन्यातून दोनदा पाणीपुरवठा होत आहे तसेच सर्व प्रभागातील नाल्या तुंबल्या असून साथीचे रोग निर्माण झाले आहेत तसेच बीड नगरपालिकेत मागील दोन मागील दोन वर्षापासून प्रशासक असल्यामुळे सी. ओ.अंधारे यांची हुकूमशाही तेथे चालू आहे नगरपालिकेला कोणीही वाली नसल्यामुळे सी. ओ. नीता अंधारे यांनी स्वतःच्या भावाला कंत्राटदार करून पुरी नावाच्या गुत्तेदाराचे रजिस्ट्रेशन वापरून पाणीपुरवठा तसेच इतर कामास मान्यता देऊन लगेच त्या कामाची बोगस देयक न. प. फंडातून तात्काळ अदा करण्यात आली याप्रकारे न.प. फंडातून जवळपास दोन कोटीच्या कामाची बोगस देयके अंधारे यांनी स्वतःच्या भावाला पुरी नावाच्या गुत्तेदाराच्या रजिस्ट्रेशन वर अदा करण्यात आली तसेच बीड नगरपालिकेतील गुंठेवारी साठी अदा करण्यात येणार्या फीस च्या अर्जदाराला पावत्या देऊन त्यानंतर नगरपालिकेच्या कम्प्युटर मधून डिलीट करण्यात आलेल्या आहेत यातही लाखोंचा घोटाळा करण्यात आलेला आहे याबाबतीत माहिती अधिकारात माहिती मागितली असता ची माहिती देण्यास बीड नगरपालिकेतर्फे टाळाटाळ करण्यात येत आहे अपील करून तब्बल एक महिना लोटल्यानंतरही माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे यावरून असे सिद्ध होते की स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी सिओ निता अंधारे या माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे नाविलाजास्त दिनांक 26 जानेवारी 2024 पासून टिपू सुलतान युवा मंच महाराष्ट्र तर्फे मा. जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा टिपू सुलतान युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. इरफान बागवान यांनी पत्रकातून दिला आहे

