नेकनूर-मांजरसुंबा रोडवर पुन्हा भीषण अपघात

राष्ट्रीय महामार्गावर झाला जीवघेणे मार्ग
बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
अहमदनगर ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसापूर्वीच कंटेनर आणि पिकप चा अपघात झाला होता यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर वाहनांचा चुराडा झाला होता आज सकाळी पुन्हा एकदा याच महामार्गावर मांजरसुंबा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ससेवाडी याच भागात पुन्हा एकदा हा भीषण अपघात झाला असून यामध्ये समोरून येणार्या हायवाने जोराची धडक दिली यामध्ये चार जण गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर नागोबाचा माळ ससेवाडी शिवारात आज सकाळच्या सुमारास एक्स युव्ही 300 (क्रमांक एम एच 23 बी सी 8231) आणि खडी वाहतूक करणारे हायवा (क्रमांक एम एच 23 -ण 1992) यांचा अपघात झाला असुन 4 जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . घटनास्थळी सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे यांनी सपोनि विलास हजारे यांनी घटनास्थळी भेट दिली असून जखमी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.एक्स यु व्ही गाडीतील अनिल सखाराम नवले रा.रूई ता.गेवराई ,अनिल आसाराम कादे रा.खेर्डावाडी ता.गेवराई कल्याण इंदरराव राऊत रा.खेर्डा बुद्रुक गेवराई व वाहन चालक हे देखील गंभीर जखमी झाले आहेत यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

