शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी कामरान खान यांची निवड

Beed

बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
प्रत्येक समाजातील लोकांना न्याय मिळाले पाहिजे या भूमिकेतून जिल्हाप्रमुख खांडे यांनी अल्पसंख्यांक आघाडी मजबुत करण्याच्या उद्देशाने बीड शहरातील सामाजिक कार्यकर्ते कामरान खान मोहब्बत खान यांची अल्पसंख्यांक आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या पाथरी येथील संपर्क कार्यालयात सोमवार दि.15 जानेवारी कामरान खान यांची निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख खांडे यांनी आतापासूनच बीड नगर पालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवत पक्ष बांधणीला प्रारंभ केला आहे. कामरान खान यांच्या निवडीने शिवसेनेला लोकप्रिय मुस्लीम चेहरा मिळाल्याचे दिसते.या प्रसंगी कामरान खान यांच्या सोबत सईद रोमन, सईद इमरान, पठाण मुजाहद, इमरान खान, शेबु खान, पठाण रिझवान, कलीम इनामदार, एस.के.मुस्तफा, एस.के. राजु, तालेफ काका, असेफ पटेल,आरेस पटेल, सय्यद सलमान, एम.डी.शाकेर,इमरान  खान, अब्दुल मतीन, माज खान,आसेफ खान यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.