देशात धर्माच्या नावाखाली भांडवलशाही बळकट होत चालली नागरिकांनी डाव्या पक्षाच्या मागे उभा राहवे-कॉ उदय नारकर

राज्यात डाव्या आघाडीची मोठबाधुन सामन्याच्या बाजीने तीव्र संघर्ष करु - कॉ सुभाष लांडे
बीड /बीडसत्ता प्रतिनिधी
जिल्ह्यातील माकप. भाकप.शेकाप या डाव्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा 12 जानेवारी रोजी नीलकमल हॉटेल येथे संपन्न झाला. जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, देशात सर्वसामान्य माणसाच्या पोटाच्या प्रश्नाशिवाय धार्मिक तेढ निर्माण करून आपण कशा पद्धतीचे धर्म उद्धार करते आहोत, हे दाखवण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे , सर्वसामान्य माणूस माहागाईने होरपाळत चालला आहे, धर्माधर्मां मध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भाजप आटापिटा करत आहे, मात्र सर्वसामान्य माणूस हा पोटाच्या पखळगी भरण्यासाठी झगडत आहे,काय विकास केला ते पंतप्रधानानी पत्रकार परिषदे घेऊन कधीच सांगीतले नाही,यामुळे धर्मंधपक्ष भाजप सरकार राजकारणातुन हद्दपार करण्याचे आव्हान उझच चे नेते कॉ उदय नारकर या वेळी केले.
देशात वाढती बेरोजगारी शेतकर्यांचे प्रश्नावर चर्चा कराय देशात महाराष्ट्र सरकारला वेळ नाही, पंतप्रधानांचा नाशिक येथे दौरा होता तर गुन्हेगारासारखे डाव्या पक्षाच्या व इतर समाजाच्या प्रश्नावर काम करणार्या प्रतिनिधींना पोलिसांनी अटक केली या घटनेचा निषेध केला , अनेक मुद्यला हात घातला सरकारवर टीका केली. आम्ही विचारासाठी कधी काँग्रेस-राष्ट्रवादीची ईतर मित्रपक्षांची साथ सोडली नाही, भाजपला अंगावर घेऊन डावे कार्यकर्ते करतात यापुढे ही करत रहातील, पन आम्हाला आमचा राजकीय वाटा हवा असल्याचे मत उझख चे नेते कॉ सुभाष लांडे यांनी व्यक्त केले उपस्थित होते, कॉ अजय बुरांडे यांनी मनोगत व्यक्त करताना शेतकरी कामगार सर्व सामान्यांच्या प्रश्नावर बीड जिल्हाअधिकारी कार्यालयावर डाव्या पक्षाचा 13 फेब्रुवारीला मोर्चा काढण्याचा ठराव मांडला सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्याला होकार दिला,
प्रस्ताविक करताना कॉ नामदेव चव्हाण यांनी जिल्ह्यातील परिस्थीतीवर कशा पद्धतीने काम करावे लागेल भविष्यात मोठ काम उभं करता येईल, यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कॉ भाऊराव प्रभाळे यांनी केले तर आभार कॉ मोहन जाधव यांनी मानले यावेळी कॉम्रेड पी एस घाडगे प्रभाळे, भाई लोंढे, भाई विष्णुपंत घोलप, भाई बाळासाहेब घुमरे, महादेवराव नागरगोजे, जोतिराम हुरकुडे,नारायण भाई गोले पाटील, उपस्थित होते.
----------------------
बीड मधील राजकीय सामाजिक परिस्थिती बघता जिल्ह्यामध्ये आम्ही भले संख्यांने कमी असो मात्र सर्वाधिक लोक चळवळीचे काम आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्व अग्रेसर असतो, आज ही डाव्या पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे यामुळे इंडिया आघाडी मधून डाव्या पक्षाला लोकसभेची जागा मागावी असा ठराव भाई मोहन गुंड यांनी मांडुन वरिष्ठांकडे मागणी केली.
-------------------------

