भाजपा मित्र पक्ष मेळाव्यास खा.प्रितम मुंडे संबोधित करणार..!

Beed

भाजपा पदाधिकार्‍यांनी बहुसंखेने सहभागी व्हावे-राजेंद्र मस्के
बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
भाजपा - महायुती मित्रपक्ष कार्यकर्त्यांचे संमेलन बीड शहारातील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 11.00 आयोजित केले आहेत. संमेलनाची भव्य तयारी चालू असून भाजपा, राष्ट्रवादी ( अजित गट ), शिवसेना ( शिंदे गट ), रिपाई ( आठवले गट ) यांच्यासह मित्र पक्षाती
ल सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात होऊ घातलेल्या या महत्वपूर्ण संमेलनात लोकप्रिय खासदार डॉ. प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे संबोधित करणार आहेत. या संमेलनास भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंखेने सामील व्हावे. असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
महाविजय 2024 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या मेळाव्याला महत्व असून, जिल्ह्यात नवीन राजकीय दिशा मिळणार आहे. या संमेलनासाठी भाजपा आमदार, सुरेश आण्णा धस, आ. लक्ष्मण अण्णा पवार, आ. नमिताताई मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे, आदिनाथराव नवले पाटील, आर टी देशमुख, भाजपा जेष्ठ नेते रमेशराव आडसकर, मोहनराव जगताप आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक आदींनी बहु संखेने सहभागी व्हावे.