दिव्यांग कायदा 1995चा आयुक्त घोडकेंनी केला गैरवापर?

Beed

मंगळवारी विचारणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास मंच जाब
बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था शाम्बरगावं पोस्ट मारतळ ता लोहा जिल्हा नांदेड च्या अस्थिव्यग निवासी विध्यालयाचे नूतनीकरण डोळे झाकून दिलं का असा सवाल डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी उपस्थित केला. 

चांगल्या शाळा डावलून रात्रीत खेळ करणार्‍यांना कोणाचा अभय आहे अस्थिव्यगा चे 200 मुले असल्याचा ठोस पुरावा विष्णूदास घोडके यांनी दोन दिवसात दाखवावा नसता दिलेलं नूतनीकरण रद्द करावं एक जबाबदार अधिकारी असं बोगस काम करत असेल तर दिव्यांग क्षेत्राला लागलेला हा कलंक आहे या बाबत दिव्यांग सचिव अभय महाजन यांनी तातडीने खुलासा करून या बोगसगिरीची चौकशी करावी संबंधित शाळेत अस्थिव्यगाचे 200 मुले नसताना विष्णूदास घोडके यांची मनमानी केली याच भान ठेवत उपसचिवचा कारभार करणारे तत्कालीन आयुक्त विष्णुदास घोडके यांना तातडीने बडतर्फ  करण्यात यावे नसता मंगळवारी आंदोलन करून जाब विचारणार असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले आहे