नमो चषक स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी वरदान ठरणार-राजेंद्र मस्के


शिरूर का. तालुक्यात नमो चषक क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन संपन्न ..!
बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात नमो चषक स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केली असून, जिल्ह्यात जवळपास दहा हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात होणार असून, या स्पर्धेचे नियोजन स्थानिक लोकप्रतिनिधी व पक्षाच्या पदाधिकारी यांनी केले आहे. कबड्डी, फुटबॉल, कॅरम, हॉलीबॉल, खो - खो, कुस्ती (मुलींची), कुस्ती (मुलांची), धावणे/ मॅरेथॉन, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, भजन गीतगायन, शरीरशौष्ट ( बॉडी बिल्डींग ), नृत्य आदि खेळांचा या स्पर्धेमध्ये समावेश आहे. भरघोस व आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत. नमो चषक स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी वरदान ठरणार असून, खेळाडूंनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा. असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी शिरूर का. येथील लोणी फाटा येथे नमो चषक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी केले.
आज शिरूर का. तालुक्यातील लोणी फाटा येथे नमो चषक स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ भारतीय जतना पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेमध्ये शिरूर का. तालुक्यातील अनेक क्रिकेट संघाने आपला सहभाग नोंदवला आहे.यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश उगलमुगले, ह.भ.प. शास्त्री महाराज, सचिन जायभाय, रामदास बडे, प्रल्हाद धनगुडे, विवेक पाखरे, मच्छिंद्र सानप, जयश्रीताई ढाकणे, गहिनीनाथ दादा पहेलवान यांच्यासह खेळाडू व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

