कामचुकार मुख्याधिकार्याच्या खुर्चीला हार घालून विविध संघटनांची निषेध करत घोषणाबाजी

माजलगाव/बीडसत्ता प्रतिनिधी
माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण हे गेल्या अनेक महिन्यापासून नियमितपणे नगरपरिषदेत न येता केवळ दलाली तसेच बोगस बिले काढण्यात पटाईत असलेले चव्हाण फक्त बिला वर सह्या करण्यासाठी येतात परंतु सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने न पाहता त्यांना दिवसे दिवस नगरपालिकेच्या कार्यालयात चकरा मारायला लावतात याचा निषेध म्हणून आज शेकाप, प्रहार संघटना तसेच मौलाना आझाद, वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने मुख्याधिकार्यांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली मुख्याधिकारी यांनी यापुढे नगरपरिषदेच्या कामकाजात सुव्यवस्था न आणल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे या आंदोलनात शेकाप चे भाई अॅड.नारायण गोले पाटील, प्रहार संघटनेचे अध्यक्ष गोपाळ पैंजणे, मौलाना आझाद युवा मंच चे जिल्हाध्यक्ष नुमान चाऊस, वंचित बहुजन आघाडीचे नेते राजरत्न खळगे, भारत डोंगरे हनुमान मनसुके, सलीम चाऊस, मयूर शर्मा व इतर बांधव उपस्थित होते

