ग्रामीण भागातील खेळाडूंना नमो चषकाच्या माध्यमातून मिळणार नवी संधी

नमो चषक स्पर्धेत खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी

व्हावे आयोजक प्रा.सचिन  जायभाये  यांचे आवाहन 

शिरूर कासर/बीडसत्ता प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरात नमो चषक 2024 च्या माध्यमातून क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमा अंतर्गत संचालक भारतीय खाद्य निगम आणि युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य सचिन जायभाये यांनी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शेरेवाडी फाटा बारगजवाडी येथे आ. सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली ’नमो चषक’ स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या कला व क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा शिरूर येथील सिद्धेश्‍वर संस्थानचे मठाधिपती विवेकानंद शास्त्री महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नमो चषक स्पर्धेच्या माध्यमातून विविध राज्यभरातील विविध ठिकाणी शाळांमधून चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पधी, क्रीडा स्पर्धा, एकांकिका स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत. आयोजक प्रा. सचिन जायभाये यांच्याकडून नमो चषक स्पर्धेत प्रथम विजेत्या संघाला रू.21000, द्वतीय संघाला रू.15000 आणि तृतीय संघाला रू.11000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.बक्षीस वितरण माजी मंत्री आणि विधान परिषद आमदार सुरेश धस यांच्या हस्ते होईल असे आयोजक सचिन रामभाऊ जायभाये यांनी म्हटले आहे.