मुख्यमंत्र्यासह दिव्यांग मंत्राल्याच्या नावाने पुण्यात चिल्लर फेक आंदोलन करणार-डॉ जितेंद्र ओव्हाळ

अनुदानासह अधिकार्याची मनमानी?
बीड/ बीडसत्ता प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसापासून दिव्यांग मंत्रालय कायमविनाअनुदानित दिव्यांग शाळेनां अनुदान देण्यात चालढकल करीत असून तातडीने अनुदान देण्याच्या मागणी साठी व कामगार मंत्रालयाचा कसलाहीं संबंध नसतानां आवर सचिव रा भा गायकवाड यांनी अकलेचे तारे तोडत सफाईगर मदतनीस पहारेकरी या कर्मचार्यांनां समान काम समान वेतनापासून रोखलं आहे एच पि सि ची मान्यता नसताना दिशा प्रकल्प माथी मारून जयवकील फॉउंडेशन ला पोसण्याचं काम होत आहे 7 पे चा फरक कर्मचार्यांनां का भेटत नाही प्रलंबित कर्मचारी यांचे समायोजन करा या व इतर अनेक मागण्यासाठी पुणे दिव्यांग आयुक्त कार्यालयावर मुख्यमंत्री तसेच दिव्यांग मंत्रालय सचिव यांच्या नावाने चिल्लर फेक आंदोलन दि 16/1/2024 रोजी करण्यात येणार असून या आंदोलनात हजारो च्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच चे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ रावसाहेब कांबळे बाबासाहेब महापुरे दिलिप जेटे प्रशांत ओव्हाळ सनी गायसमुद्रे हिराचंद काळे रमेश थोरात यांनी केले.

